Latest News * आजची बातमी *

बिटस्तरीय यशवंतराव कला क्रीडा महोत्सव     

दिनांक २७ नोव्हेम्बर, २०१९ 

 
 
तारीख  ९/११/२0१९.

क्रांतीकारक राघोजी भांगरे व बिरसा मुंडा यांची जयंती संपन्न••

गोद्रे- ८नोव्हेबर- क्रांतीकारक राघोजी भांगरे व १५ नोव्हेंबर- धरती आबा बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त आदिवासी क्रांतीकारक राघोजी भांगरे व जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण सरपंच विनोद रेंगडे, माजी सरपंच भिमाजी उतळे, उद्योजक मधुकर रेंगडे व ज्ञानदा माध्यमिक विद्यालयचे मुख्याध्यापक मनियार सर यांचे हस्ते करण्यात आले.उपस्थित सर्वांनी त्यांच्या प्रतिमांचे पूजन करून विनम्र अभिवादन केले.त्यानंतर झालेल्या छोट्याच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांनी त्यांच्या बद्दल माहिती दिली. त्यांच्या जीवनकार्याबद्दल श्री.तानाजी उतळे सर व श्री.आ.का.मांडवे सर यांनी मार्गदर्शन केले. जेष्ठ पत्रकार कांबळे सरांनी”विद्यार्थ्यांनी भविष्यात या महान क्रांतीकारकांपासून प्रेरणा घेऊन इतिहास चिकित्सकपणे वाचावा व उद्याच्या स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी उत्तमाचा ज्ञान ग्रहण करावे.आदिवासी हा निसर्ग पूजक असल्याने त्यांच्या चालीरिती, रूढी व परंपरा यांची माहिती वडिलधाऱ्यांकडून करून घ्यावी.त्याची जोपासना करणे भविष्यात अत्यंत महत्त्वाचे आहे असे सांगितले मा. सरपंच विनोद रेंगडे व मुख्याध्यापकांनी ही मोलाचे विचार मांडले आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. मधुकरशेठ रेंगडे म्हणाले की, भविष्यात हा जयंती महोत्सव समाजाला दिशादर्शक ठरावा यासाठी प्रयत्न केला तर जाईलच पण त्यामधून समाजाच्या समस्यांची सोडवणूक व जडणघडण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला जाईल. सामाजिक आचार विचारांची देवाणघेवाण करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने योग्य पावले उचलली जाण्याचा संकल्प करू या.
या प्रसंगी नामदेव रेंगडे(चेअरमन), सुनिल कांबळे,पांडुरंग क्षीरसागर,बाळासाहेब रेंगडे, मंगेश गायकवाड,अनिल गायकवाड (अध्यक्षSMC),धोंडू रेंगडे,श्रावण मांडवे,विष्णू रेंगडे, विक्रम गवारी तसेच ज्ञानदा माध्यमिक विद्यालयाचा शिक्षक वृंद विद्यार्थी व ग्रामस्थ, युवक उपस्थित होत.कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन श्री.अंकुश गवारी व श्री.धनंजय रेंगडे यांनी केले. ‘वंदे मातरम्’ ने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

 

 

 

* * * * * * * * * * * * * * * * *  

 

श्री हटकेश्वर ज्ञानमंदिर गोद्रे या शाळेचा         ” शताब्दी महोत्सव “

रविवार दिनांक ०९.१२.२०१८ रोजी